नगर महानगरपालिकेच्यावतीने कम्युनिटी किचन पुन्हा सुरु
कंटेनमेंट झोनमधील गरजू नागरिकांना दिलासा
नगर,(दि.02 जुलै) : अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने दररोज शहराचा नवीन भाग हा कंटेनमेंट एरिया (हॉटस्पॉट) एरिया मनपाला घोषित करावा लागत आहे. त्यामुळे कंटेनमेंट एरिया पूर्णपणे बंद करावा लागत असल्याने त्या भागातील रहिवासी यांना कामावर जाता येत नाही. दुकानदार व्यावसायिकांना दुकाने उघडता येत नाहीत. कंटेनमेंट एरियातील हातावर पोट असलेले गरीब वर्ग, मोलमजुरी करणारा वर्ग इत्यादींची उपासमार होऊ नये यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन पुनश्च सामाजिक संस्था, प्रतिष्ठीत नागरिक, देणगीदार, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्र्याने कम्युनिटी किचन संजोग हॉटेल यांचे सहकार्र्याने दि.1 जुलैपासून पुन्हा सुरु केले आहे.
सदर कम्युनिटी किचनमार्फत अहमदनगर शहरातील कंटेनमेंट एरिया सिध्दार्थनगर, नालेगांव, तोफखाना येथील भागातील गोरगरीबांना दररोज दुपारी जवळजवळ 1000 नागरिकांना पोळी-भाजीचे (फुड पॅकेटस) त्यांचे एरियात घरोघर जाऊन मनपा कर्मचार्यांचे मार्फत वाटप करण्यात येत आहे. तरी गोरगरीब वर्गातील लोकांनी या कम्युनिटी किचनचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.

Tags:
Ahmednagar