जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत उत्कर्ष शेटीया व प्रणव भैलुमे प्रथम

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा 
मंडळ आयोजित चित्रकला स्पर्धा

चित्रकला स्पर्धेतून कोरोनाच्या संक्रमणापासून
बचाव व व्यसनाचे दुष्परिणामाची जनजागृती 

नगर,( दि. 01 जुलै ) : स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती व अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत लहान गटात उत्कर्ष शेटीया तर मोठ्या गटात प्रणव भैलुमे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव व व्यसनाचे दुष्परिणामाच्या जनजागृतीसाठी या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेला शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.



सदर ऑनलाईन चित्रकला स्पर्धा निशुल्क घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावी लहान गटात प्रथम-उत्कर्ष शेटीया (केडगाव), द्वितीय- रोहित लोखंडे (मांडवगण ता. श्रीगोंदा), तृतीय- ओम कबाडी (केडगाव) तसेच अकरावी ते महाविद्यालयीन मोठा गट प्रथम- प्रणव भैलुमे (सर्जेपुरा, नगर शहर), द्वितीय- उन्नती शेटीया (केडगाव), तृतीय- पूजा सकट (नालेगाव, नगर शहर) यांनी बक्षिसे पटकाविली. 

या स्पर्धेसाठी कोरोना योध्दे हेच खरे हिरो, कोरोना संक्रमणापासून बचावाच्या उपाययोजना, अंमली पदार्थ मानवी जीवनाला लागलेली कीड, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम हे दोन्ही गटासाठी विषय देण्यात आले होते. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांचे डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post