ग्राहकांना ऑनलाइन सेवांविषयी जागृती

महावितरण  कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम

नाशिक परिमंडळात एक लाख ग्राहकांशी साधला संपर्क 


नगर, (दि.०३) : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या या काळात महावितरणचे कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत पाहून अखंडित वीज पुरवठा करण्याबरोबरच घरी बसून सुद्धा ग्राहकांशी मोबाईल वर संपर्क साधून त्यांना महावितरणच्या ऑनलाईन सेवांची माहिती देत आहेत. यामध्ये अहमदनगर मंडळात मागील १० दिवसांत जवळपास १०५ अधिकारी व कर्मचारी यांनी ३२ हजार ९७८ ग्राहकांना तर नाशिक परिमंडळात  १ लाख ग्राहकांशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे.

महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर आणि अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार कर्मचारी घरून हा संवाद करीत आहेत. यामध्ये नाशिक शहर मंडळातील ११२  कर्मचारी यांनी ३४ हजार ८५६ ग्राहक, मालेगाव मंडळातील  कर्मचारी १६८ यांनी २९ हजार ८१० ग्राहक आणि अहमदनगर मंडळातील १०५ कर्मचारी यांनी ३२ हजार ९७८ ग्राहक यांचेशी मोबाईल वर संपर्क साधून त्यांना ऑनलाईन सेवा यामध्ये मोबाईल ॲप, वेबसाईट,  ऑनलाईन देयक भरणा, मीटर रिडींग या अशा महितीबरोबर शंकाचे निरसन सुध्दा केले आहे. आणि ही प्रक्रिया सुरू आहे.

वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी घरबसल्या 'ऑनलाईन' सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांसाठी महावितरण मोबाईल ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना त्यांचा स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल ॲपची सेवा उपलब्ध आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्याबरोबर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे.

मोबाईल क्रमांकांची  नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाईलवर ‘एसएमएस’ द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी याआधी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन' द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे.

तसेच 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी  ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अँप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून ‘अन्ड्राईड’, ‘विंडोज’ व ‘आयओएस’ या आँपरेटींग सिस्टीममच्या मोबाइलमध्ये हे अँप डाऊनलोड होईल अशी सुविधा आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह गुगल प्लेस्टोर, अपल अप स्टोरमधून डाऊनलोड करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी विजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी तसेच इतर सेवांसाठी महावितरणच्या 'ऑनलाईन' सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post