‘घर घर लंगर’ सेवेतून रोज साडेसहा हजार डब्यांचे वितरण


जिल्हा लॉकडाऊन झाल्यावर शीख पंजाबी समाज, 

तसेच लायन्स इंटरनॅशनलचे सदस्य यांनी एकत्रित येऊन 

लंगर सेवेची संकल्पना सुरू केली

नगर (दि.25) : जिल्हा कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यावर शीख पंजाबी समाज, तसेच लायन्स इंटरनॅशनलचे सदस्य यांनी एकत्रित येऊन लंगर सेवेची संकल्पना सुरू केली. सुरवात टॉप अप पेट्रोल पंप या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर नगर पोलिसांसोबत एपी लॉन्स या ठिकाणी मोठ्या वास्तूत ही सेवा सुरू झाली. आता या सेवेमार्फत दररोज सुमारे सहा हजार 400 डबे गरजू व गरीब नागरिकांना पुरविले जातात.

घर घर लंगर सेवेत चाळीस लोक सेवा करीत असून, त्यात महत्त्वाचा वाटा उचलणारी, म्हणजे वाटप टीम आणि किचन वाटप टीम 9 विभागांत विभागली आहे. प्रत्येक टीमचे सदस्य दररोज किमान 600 आणि जास्तीत जास्त 950 डबे वितरित करतात. किचन सुरू करताना पहिल्या दिवशी तीन मार्चला 650 टिफीन तयार करण्यात आले होते. आज हा आकडा सहा हजार 400 पर्यंत पोचला आहे; परंतु मागणी किती जरी असली, तरी किचन टीम माघार घेत नाही. कॉम्प्युटर मॅनेजमेंट आलेल्या सर्वांचे पत्ते नोंद करून त्यांच्यापर्यंत डबे व्यवस्थित जातात काय याची देखरेख ठेवली जाते, अशी माहिती हरजितसिंग वधवा यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post