विनाकारण रस्त्याव फिरणार्या 1700 जणांवर कारवाई
200 पेक्षाही जास्त वाहने जप्त
नगर (दि.05) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने अनेक व्यक्ती हे बाहेर फिरत असल्याने आता पोलिस कठोरतेची भुमीका घेताना दिसत आहे. सध्या नगर शहरात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. नगर शहरामध्ये सुमारे दोनशेहून अधिक वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. पोलिसांनी 1700 जणांना विरुद्ध कारवाई केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने सर्व काही ठप्प आहे. मात्र, अशाही परिस्थितीत विविध कामांचे निमित्त करून विनाकारण रस्त्यावर फिरणारे आहेतच. अशाप्रकारे जिल्ह्यात रस्त्यावर विनाकारण फिरणार्या सुमारे 1700 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात संचारबंदीचा आदेश लागू केल्यानंतर जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व काही ठप्प ठेवण्यात आले आहे. दवाखाने, किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी - विक्री होत आहे. खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
नगर शहरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: रस्त्यावर येऊन लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांवर कारवाईसुद्धा केली, तरीही लोक घरी राहण्यास तयार नसल्याने आता पोलिसांनी कठोर भुमीका घेत रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांची वाहने जप्त केली आहे. तसेच पुढील काळात विनाकारण रस्त्यावर आल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्याला सामोरे जावे लागत आहे. नगर शहरात आतापर्यंत एक हजार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सुमारे सातशे लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
शहरात जवळपास 700 जणांवर कारवाई : संदीप मिटके
नगर शहरात आतापर्यंत सुमारे एक हजार 700 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी घरात बसावे. बाहेर पडल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक, नगर

