दारुची वाहतुक करणारे दोघे एलसीबीच्या ताब्यात


केडगाव भूषणनगर भागात एलसीबीची कारवाई 

चारचाकी वाहनासह दारुचा माल जप्त

नगर (दि.26) : शहरातील केडगाव भागातील भूषणनगर परिसरात विनापरवाना दारु वाहतूक करणार्‍या इनोव्हासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.  तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत 8 लाख 35 हजार 640 रुपयांचा इनोव्हासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपीमध्ये सिध्देश संदिप खरमाळे (वय 23, रा.भांडगाव, ता.पारनेर), संदेश सिताराम शिंदे (वय 24, रा.निमगाव वाघ, ता.जि.अ.नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर या कारवाईत अर्जुन कांता काळे (रा.निमगाव वाघ, ता.जि.अ.नगर), अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही) ही दोघे फरार झाले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार नगर शहरातील लिंकरोड, भूषणनगर येथे सापळा लावून दोन पंचासमक्ष इनोव्हा (क्र.एम.एच 16, बीएच 6334) ही पकडण्यात आली. यावेळी गाडीची तपासणी केली असता, 17 हजार 820 रुपयांच्या ट्युबर्ग स्ट्रोंग बिअरचे 9 बाँक्स, 17 हजार 820 रुपयांचा किंगफिशर बिअरचे 9 बाँक्स, 8 लाख रुपये किंमतीचे इनोव्हा सह एकूण 8 लाख 35 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोकाँ शिवाजी ढाकणे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोकाँ शिवाजी ढाकणे, पोना सचिन आडबल, संतोष लोढे, पोकाँ रणजित जाधव, सागर ससाणे, प्रकाश वाघ आदिंच्या पथकाने ही कारवाई केली. 

Post a Comment

Previous Post Next Post