श्री विशाल गणेश मंदिरच्यावतीने कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी एक लाख रुपायाची मदत


नगर (दि. 08) : देशात व राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परीस्थतीत पंतप्रधान नरेंद मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहनास प्रतिसाद देऊन नगरच्या श्री विशाल गणेश मंदिरच्यावतीने एक लाख रुपयाची मदत केली असल्याचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुपये ५० हजार, तर पंतप्रधान केअर फ़ंडामध्ये रुपये २५ हजार, तसेच नगरमधील जनकल्याण समिती यांना  समाजातील गरजू लोकांना धान्य वाटपासाठी रुपये २५ हजारची मदत करण्यात आली आहे.
देशात व राज्यात आलेले संकट दूर करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. लॉकडाऊनमुळे आज सर्वच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. सर्वानी प्रशासनाचे नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे अभय आगरकर यांनी सांगितले. श्री विशाल गणेश मंदिरच्यावतीने मदत देण्याचा निर्णय उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, सहसचिव रामकृष्ण राऊत, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, विजय कोथींबीरे, बाबासाहेब सुडके, हरिश्चन्द्र गिरमे, भाऊसाहेब फुलसौदर, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, ञानेश्वर रासकर, गजानन ससाणे, रंगनाथ फुलसौदर, शिवाजी शिंदे , प्रकाश बोरुडे आदींनी फोनवरून विचारून घेण्यात आला.

आज हुनुमान जयंती निमित्त माळीवाडा पंचमंडळच्या वतीने शनी मारुती मंदिर येथे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते महापूजा करून आरती सकाळी ६ वाजता करण्यात आली. नेहमी जयंतीला गजबजणारी मंदिरे मात्र यावेळी कोरोनामुळे शांत व सुन्न होती.

Post a Comment

Previous Post Next Post