मुंबई, (दि.08) : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनचा
परिणाम सर्वच क्षेत्रांवर पाहायला मिळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वजण
घरात थांबून आपापल्या परीने एकमेकांना मदत करत आहेत. यात सेलिब्रिटीही मागे
नाहीत. तेही जनतेत कोरोनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न करत
आहेत.
मात्र, तरीही कलाकार काही ना काही कारणावरून ट्रोल होत आहेत. या
ट्रोलिंगवरूनच अभिनेत्री आणि निर्माती दीपिका पदुकोण ही सुद्धा संतापली
आहे. लोकांनी कलाकारांना, सेलिब्रिटीजना मुर्ख समजणं थांबवायला हवं, अशा
शब्दात तिने सडेतोडपणे आपलं मत मांडलं आहे. एका मुलाखती दरम्यान दीपिकाने
आपलं मनोगत व्यक्त केलं.
तिला लॉकडाऊन स्थितीत मानसिक आरोग्य जपण्याविषयी काही प्रश्न विचारण्यात
आले. घरी राहिल्यामुळे दीपिका स्वतःसुद्धा स्वयंपाक, घरची आवराआवर,
साफसफाई अशा गोष्टींकडे लक्ष देत आहे. डिप्रेशनसारख्या मानसिक आजारातून बरं
झाल्यामुळे लॉकडाऊन स्थितीत शांत राहणं तिच्यासाठी कठीण नसल्याचं तिने
सांगितलं.
Tags:
Maharashtra
