सामाजिक बांधिलकी : महापौरांकडून गरजूंना किराणा
नगर (दि.01) : वेळ आली आहे. तरी गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरविण्याचे काम आम्ही करत आहोत. तसेच शहरातील दीन-दुबळ्यांना जेवणाची व्यवस्था केली आहे. भाजप पक्षाच्यावतीने देशभर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सुरु आहे. कोरोना विषाणूच्या संकटाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी घरातच राहून सहकार्य करावे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावतीने ठिकठिकाणी गरजवंतांना मोफत किराणा माल घरपोच देण्याची व्यवस्था व दीनदुबळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब वाकळे, पुष्कर कुलकर्णी, केशव वाकळे, किशोर वाकळे, बिभीषण आडोळे, संदीप आडोळे आदी यावेळी उपस्थित होते.
महापौर म्हणाले की, नगर महानगरपालिकेच्यावतीने कोरोना संसर्ग विषाणूवर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. मनपाच्यावतीने पूर्ण क्षमतेने उपाययोजना सुरु आहेत. शहरामध्ये सर्व भागामध्ये कीटकनाशक फवारणी होत आहे. तसेच स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेण्याचे कामही सुरु आहे. तरी नागरिकांनी आपआपल्या घरात राहून शासनास सहकार्य करावे असे ते म्हणाले.

Tags:
Ahmednagar