जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय साधने वाटप

नगर (दि.08) :  कर्जत तालुका आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काम करताना पुरेशी काळजी घेण्याची साधने उपलब्ध नसल्याने कर्जत येथील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने त्यांना अध्यक्ष महेश तनपुरे यांनी साधने उपलब्ध करून दिली आहेत.

राज्याचे वनमंत्री संजय राठोड आणि जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण कर्जत यांच्यावतीने ७ रोजी आरोग्य विभागाला मास्क, हातमोजे, ळळ हॅण्डवॉश, सॅनिटायजर देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महेश तनपुरे, नगरसेवक सचिन घुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, धनंजय लाढाणे, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, धनंजय भगत यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

कर्जत तालुक्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संखेने आशा स्वयंसेविका घरोघरी फिरून काम करीत असताना त्यांचेकडे त्यांची काळजी घेण्याची पुरेशी साधने नसल्याने आपण सामाजिक जाणिवेतून त्यांना हे साहित्य दिले. आमची काळजी घेत असताना त्यांनी स्वतः चीही काळजी घ्यावी, असे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post