शिर्डीत प्रशासनकडून ड्रोन कॅमेराद्वारे नजर


शिर्डी (दि.08) : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणार्‍या शिर्डीत लॉक डाऊनच्या काळात आता महत्त्वाच्या ठिकाणी व गर्दी होण्याची शक्यता असणार्‍या ठिकाणी प्रथमच ड्रोन कॅमेरा द्वारे पाहणी करण्यात येणार असून नियम तोडणार्‍यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

सध्या कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे. सर्व बंद आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ठप्प आहे , कोणालाही विनाकारण शहरात संचार करायला बंदी आहे, असे असतानाही काही लोक नियम तोडून फिरत असतात, अशांवर यापूर्वीही अनेकदा नजर ठेवण्यात येऊन कारवाई करण्यात आली आहे, मात्र नजर चुकवून असे काही लोक फिरत असतातच, उगाच काहीतरी बोगस कारण सांगून इकडून तिकडे फिरत असतात किंवा किराणा दूध भाजीपाला, मेडीकल घेण्यासाठी अशा दुकानात सोशल डिस्टेंस न पाळता गर्दी करतात, विनाकारण कोणतीही दक्षता न घेता व नियम न पाळता गर्दी करत असतात, अनेकदा पोलीस आहे, तोपर्यंत सर्व नियम पाळले जातात, परंतु पोलीस व्हॅन निघून जाताच परत जैसे थी परिस्थिती तेथे होत असते, यावर आता नियंत्रण मिळवण्यासाठी शिर्डी पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दीपक गंधले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत खाजगी ड्रोन कॅमेरा द्वारे पाहणी करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post