घरावर रोषणाई करा, दिवे लावा, मात्र आंबेडकर जयंती घरीच साजरी करा : जोगेंद्र कवाडे

 
मुंबई (दि.07) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला जयंती आहे.  दरवर्षी बौद्ध बांधव बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. बौद्ध विहारात एकत्र येऊन विविध उपक्रम राबवत असतात. मात्र, यंदा बाबासाहेबांची जयंती घरात राहूनच साजरी करावी, त्या महामानवाला हीच खरी आदरांजली असेल. तसेच, घरावर रोषणाई करा, दिवे लावा मात्र, घरातच आंबेडकर जयंती साजरी करा असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केलं आहे.

जोगेंद्र कवाडे म्हणाले, मी दरवर्षी जयंती निमित्त देशभर, राज्यभर फिरत असतो. पण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे कुठेच जाणार नाही. मी ही माझ्या संपूर्ण परिवारासोबत येणाऱ्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोरोनाच्या महामारीमुळे घरीच साजरी करणार आहे. तुम्हीही करा, “14 एप्रिल रोजी आपल्या घरावर रोषणाई करा, दिवे लावा मात्र, सार्वजनिक ठिकाणी काही कार्यक्रम करू नका. अशी विनंती करतो.” असे जोगेंद्र कवाडे म्हणाले.

तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 500 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post