मनपा कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन मागे


नगर (दि.04 ) :  बोल्हेगाव परिसरात मनपा स्वच्छता निरीक्षकास झालेल्या मरहाणीमुळे मनपा कामगार युनियनतर्फे दोन दिवसांपासून सुरु असलेले कामबंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार दि.4 रोजी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवर व मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे आणि पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले  असल्याची  लोखंडे  यांनी  सांगितले.

बैठकीत आयुक्त मायकलवार यांनी संबंधित घटनाक्रमामध्ये त्या नगरसेविकेचा सहभाग आढळल्यास नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्‍वासन युनियनच्या पदाधिकार्‍यांना दिले आहे. आपत्कालीन परिस्थितीत कचरा उचलण्याची अत्यावश्यक सेवा बंद ठेवता येणार नाही असेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.

आयुक्त म्हणाले, नगर शहरातील कोणी व्यक्ती करोनाबाधित नाही ही शहरासाठी जमेची बाजू आहे. ‘ट्रॅव्हलिंग हिस्ट्रीतून’ शहरात करोना पोहोचला. जे सापडले ते बाहेरून प्रवास करून आलेले होते. सुरक्षात्मक उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे सर्व्हेक्षण करुन उपाययोजना केल्या गेल्याचे मायकलवार यांनी म्हंटले आहे.

कर्मचार्‍यांनी कामावर हजर व्हावे :  लोखंडे   

महापालिकेने मागण्यांबाबत आश्‍वासन दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. आश्‍वासन मिळाल्याने आम्ही समाधानी असल्याचे युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी म्हंटले आहे. कर्मचार्‍यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post