नगर (दि.03) : माझे गांव, निरोगी गांव, स्वच्छ गांव या संकल्पनेतून घोसपुरी(ता.नगर) सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुनिल ठोकळ यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण घोसपुरी गावात घरोघरी जाऊन स्वखर्चाने सॅनिटायजरचे वाटप करत नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रबोधन केले. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
घोसपुरी गावठाण आणि वाड्यावस्त्यांवर जावून त्यांनी सुमारे ५०० सॅनिटायजरच्या बाटल्या वाटप केल्या. यावेळी नागरिकांना आवाहन करताना सुनिल ठोकळ म्हणाले, आज भारतासह जगातील प्रत्येक देश हा कोरोना या विषाणूच्या दहशती खाली जगत आहे. आपण सर्वांनी मिळवून त्याची दहशत थांबवण्याची गरज आहे. जर आपण थोडी खबरदारी घेतली, शासकीय यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन केले तर आपण निश्चित कोरोना या रोगावर मात करून त्याला हरवू शकतो.
मी आणि माझा परिवार निरोगी तर माझा गांव निरोगी आणि माझा देश निरोगी असा विचार करून सर्वांनी काम करावे. मी माझ्या गावासाठी माझा थोडासा हिस्सा म्हणून गावंचा नागरिक तसेच या गांवातील जनतेचे काही देणे लागतो या नात्याने गांवातील प्रत्येक घरात जाऊन सॅनिटायजरचे वाटप केले. तसेच कोरोना या रोगाविषयी मार्गदर्शन केले. कोरोना ला घाबरू नका. आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सरकारी यंत्रना यांचे वर विश्वास ठेवा. घराबाहेर पडू नका. घरातच थांबा. सरकारी आदेशाचे पालन करा व कोरोना या रोगावर मात करा. असे आवाहन यावेळी सुनिल ठोकळ यांनी केले.

अडचणीच्या काळात गरजूंना मदत करा
कोरोनाचे हे संकट जागतिक संकट आहे. त्याच्याशी मुकाबला करताना समाजातील गरजूंना प्रत्येकाने मदतीचा हात देण्याची गरज आहे. देशभरात संचार बंदी लागू असल्यामुळे अनेक गोरगरिबांना दररोजच्या रोजीरोटीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने गरजूंना शक्य तेवढी मदत करावी. जीवनावश्यक वस्तू द्याव्यात असे आवाहनही सुनिल ठोकळ यांनी केले आहे.
Tags:
Ahmednagar