पाथर्डीत लाखो रुपयांच्या तेलावर डल्ला...


 पाथर्डीत गोडावून फोडून तेलाचे डबे चोरणारे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर (दि.24) : पाथर्डीत किराणा दुकानाचे गोडवून फोडून खाद्य तेलाचे डबे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. आरोपीकडून 5 लाख 7 हजार 622 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीमध्ये रंगनाथ दिलीप गायकवाड (वय 20, रा.हंडाळवाडी, ता.पाथर्डी), सुरज शामराव दहिवाले (वय 25,रा.इंदिरानगर, पाथर्डी), असीफ लाला शेख (वय 25, रा.तकीया मस्जिद,चिंचपूररोड, पाथर्डी), फिरोज लाला पठाण (वय 29, रा.रंगारगल्ली, पाथर्डी), अजहर सलीम शेख (वय 25, रा.रंगारगल्ली, पाथर्डी) यांचा समावेश आहे. आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पाथर्डी शहरातील नगरपालिका शाँपिंग सेंटरच्या गाळ्यामध्ये होलसेल किराणा मालाचे गोडवून लाँकडाऊनमध्ये बंद ठेवण्यात आले आहे. दि.13 ते 19 एप्रिल च्या दरम्यान, गोडाऊनचे शेटर तोडून अज्ञात चोरट्यांनी 9 लाख 50 हजार 920 रुपयाचे खाद्यतेल डबे चोरुन नेल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात अल्पेश अशोक भंडारी यांनी दाखल केला होता.

सदरचा गुन्हा रंगनाथ गायकवाड व त्याच्या साथीदार मिळून केला असल्याची माहिती खबर्‍यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली. यानंतर त्यांच्या पथकाने पाथर्डी येथे जाऊन तपास करुन रंगनाथ दिलीप गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता, रंगनाथ दिलीप गायकवाड (वय 20, रा.हंडाळवाडी, ता.पाथर्डी) याने सुरज शामराव दहिवाले (वय 25,रा.इंदिरानगर, पाथर्डी), असीफ लाला शेख (वय 25, रा.तकीया मस्जिद, चिंचपूररोड, पाथर्डी), फिरोज लाला पठाण (वय 29, रा.रंगारगल्ली, पाथर्डी), अजहर सलीम शेख (वय 25, रा.रंगारगल्ली, पाथर्डी) अशा सर्वांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली टेम्पो (क्र.एमएच 24,एबी 5813) आणि चोरलेले तेलाचे डबे असा एकूण 5 लाख 7 हजार 622 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, देवीदास काळे, पोना रविंद्र कर्डीले, रोहित मिसाळ, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, विनोद मासाळकर, दीपक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post