निवृत्तीधारकांचे मार्च महिन्याचे वेतन लवकरच जमा होईल
नगर (दि.01) : जिल्ह्यातील राज्य शासकीय सेवानिवृत्तीवेतन धारकांचे माहे मार्च २०२० या महिन्याचे दिनांक १ एप्रिल २०२० रोजी देय असलेले मासिक निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही जिल्हा कोषागार कार्यालय, अहमदनगर यांनी पूर्ण केलेली आहे.
माहे मार्च 2020 महिन्याचे निवृत्तीवेतन संबंधीत निवृत्तीवेतनधारकांच्या बॅक खात्यामध्ये लवकरच जमा होईल असे जिल्हा कोषागार अधिकारी महेश घोडके यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे
