शासनाच्या आदेशांचे पालन केल्यास नक्की सुरक्षित राहू : नगरसेवक प्रकाश भागानगरे
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १४ मध्ये कीटकनाशक फवारणी सुरु
नगर (दि.01) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कोणीही घाबरून न जाता प्रत्येकाने आपआपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे. आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक विविध भागात कामे करत आहोत. त्यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी प्रभागामध्ये नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहे. प्रभाग १४ मध्ये प्रत्येक भागामध्ये फवारणी करण्याचे काम हाती घेतले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम प्रत्येकाने करावे, असे प्रतिपादन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १४ मध्ये प्रकाश भागानगरे यांनी फवारणीचे काम स्वतः हातात घेऊन सुरु केले.
नगरसेवक भागानगरे म्हणाले की, समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकजन समाजास काहीतरी देणे लागतो. या हेतूने समाजहिताचे काम करणे गरजेचे आहे. मानवता हाच धर्म समजून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पडून समाजसेवा करुन नागरिकांना आपल्यावर आलेले हे कोरोना विषाणूचे संकटास घाबरुन न जाता त्यास तोंड देऊ व शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करुन एक प्रकारचे देशाबद्दल असलेली आपुलकी, प्रेम व भावना सर्वांनी दाखवावी, असे ते म्हणाले.

Tags:
Ahmednagar