नगर तालुक्‍यात शिवभोजन थाळी सुरु करण्‍यासाठी 30 एप्रिलपर्यत अर्ज करावे

नगर (दि.28) : शासनाच्‍या निर्देशानुसार नगर तालुक्‍यात नोव्‍हेल कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवीर गरीब व गरजू लोकांना अन्‍न मिळावे म्‍हणून शिवभोजन थाळी सुरु करण्‍यात येणार आहेत.  इच्‍छूक असणा-या व्‍यक्‍तींकडून दि.30 एप्रिल 2020 पर्यत तहसील कार्यालय, नगर येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत अर्ज मागविण्‍यात येत आहेत. या मुदतीनंतर प्राप्‍त झालेल्‍या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

इच्‍छूक व्‍यक्‍तीनी शिवभोजन थाळी सुरु करण्‍यासाठी अर्जासोबत  हॉटेल, रेस्‍टॉरंट राज्‍य परवाना, अन्‍न व प्रशासन यांचा नोंदणी दाखला, आगप्रतिबंधक प्रमाणपत्र, वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र, व्‍यवसायिक गॅस सिलेंडर  प्रमाणपत्र व भोजनालय चालविण्‍याचे आवश्‍यक प्रमाणपत्र ही कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे. शिवभोजन थाळी संदर्भात  प्राप्‍त झालेल्‍या अर्जाची दि.1 मे 2020 रोजी तालुकास्‍तरीय समितीकडून छाननी करुन पात्र अर्ज निवडण्‍यात येतील असे तालुका दंडाधिकारी तथा अध्‍यक्ष आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, अहमदनगर यांनी प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post