नगर: दि.23 - नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील श्रीमती शांताबाई रंगनाथ शेवाळे यांचे दीर्घ आजाराने रविवारी दि. 22 मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास निधन झाले. सामेवारी सकाळी नऊ वाजता वडगाव गुप्ता येथील वैकुंठधाम येथे अत्यंविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शांताबाई यांचा स्वभाव धार्मिकवृत्तीचा होता, तसेच नेहमी दुसर्यांना मदत करणारा होता. प्रा.संजय व बाळासाहेब यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने नगर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Tags:
Ahmednagar