विनाकारण फिरणार्‍यांना, जिल्हाधिकार्‍यांनी दिली समज


 प्रतिबंध झुगारुन रस्त्यावर येणार्‍या वाहनचालकांना

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच दिली समज

नगर : जिल्ह्याच्या नागरी भागात खासगी वाहने आणि खाजगी प्रवासी वाहनांना प्रतिबंध असतानाही काही नागरिक मोकळ्या रस्त्यांवर येत होते. हे रोखण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रस्त्यावर उतरले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह या वाहनचालकांना रोखून त्यांना समज दिली. जे वाहनचालक विनाकारण रस्त्यात फिरत होते, त्यांच्यावर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले.

 

आज सकाळीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर शहरातील परिस्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी स्वता बाहेर पडले. जुना बाजार, जुनी महानगरपालिका, प्रोफेसर कॉलनी चौक, दिल्लीगेट, नालेगाव, नेप्ती नाका, जुनी महानगरपालिका यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी प्रत्यक्ष जाऊन विनाकारण रस्त्यावर आलेल्या वाहनचालकांना थांबवले. पोलीसांना त्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्यास सांगितले. ज्यांच्याकडे योग्य कारण सापडले नाही, अशा वाहनचालकांना  दंड करण्यास पोलिसांना सांगितले. तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दलही त्यांच्यावर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.


जिल्हयातील अहमदनगर महानगरपालीका, सर्व नगरपालीका, नगरपंचायत व अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे हददीमध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी सर्व खाजगी वाहने व खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनांना 31 मार्चपर्यंत प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जारी केले होते.  मात्र तरीही विनाकारण रस्त्यांवर फिरणार्या या वाहनचालकांना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी फटकारले आणि समज दिली.

Post a Comment

Previous Post Next Post