नगर : करोना (कोव्हिड19) चा संसर्ग व् प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्या वर तात्काळ निंयत्रण करने व करोना (कोव्हिड 19) चा संसर्ग आसल्यास त्यात आधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या करीता राज्य शासनाने करोना (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखने साठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासून लागु करुण खंड 2,3,4, मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमित केल्या आहेत. त्या आनुशंघाने अहमदनगर शहरामधे गस्त घालत असताना सार्वजानिक रस्त्यावर गैरवर्तन करुण शांतता भंग करणार्या जवळपास 132व्यक्तींवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 112 कलमान्वये तसेच 117 नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यामधे कोतवाली पोस्टे 65 तोफखाना 55 भिंगार कैंप 12 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी पोलिस अधिक्षक सागर पाटिल, नगर शहराचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, नगरचे तहसीलदार उमेश पाटिल, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बोरगे, कोतवाली पोलिस निरीक्षक विकास वाघ, तोफखाना पोलिस निरीक्षक एच.पी.मुलांनी, भिंगार कैंप सहा.पोलिस निरीक्षक पाटिल यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचार्यांनी ही कारवाई केली आहे.
सर्व नागरीकानी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामारे जावे लागेल.
Tags:
Ahmednagar
