नगरसेवक आक्रमक..छिंदमला सभागृहाबाहेरचा रस्ता दाखवला!


| अहिल्यानगर | दि.27 मार्च 2026 |  छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदमला महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर काढले. छिंदम याला सभागृहात बोलण्याचा व बसण्याचा अधिकार नाही. त्याला प्रवेश न देण्याचा ठराव करा, त्याला बाहेर काढा, असे म्हणत सर्व नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला.

अंदाजपत्रकीय चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम यांनी बजेटवरील चर्चेत सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, मयूर बांगरे, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे,  विकी जगताप यांनी त्याला सभागृहात बसण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. भाजपाचे नगरसेवक अमोल येवले यांनीही या मागणीस पाठिंबा दिला. 

त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे व ठाकरे गटानेही त्याला सभागृहातून बाहेर काढावे, अशी मागणी केली. संपत बारस्कर यांनी छिंदम याला सभागृहात न थांबता बाहेर जाण्याबाबत सांगितले. त्यानंतर सुरेश बनसोडे यांच्यासह काही नगरसेवकांनी आक्रमक होत त्याच्या दिशेने धाव घेतली. सर्वांनी मिळून त्याला सभागृहातून बाहेर काढले.

Post a Comment

Previous Post Next Post