खबरदार आता दारु पिऊन वाहन चालविल्यास!...

। नवी दिल्ली । दि.28 फेब्रुवारी 2026 ।  राज्यभरात अनेक ठिकाणी दारु पिल्यामुळे अपघात होत आहेत. अनेकदा दारु पिल्यानंतर आपण कसे वाहन चालवितो याचा सुध्दा पत्ता वाहन चाविताना राहत नाही. यामधून अपघाताचे प्रकार होत असून याला आळा घालण्यासाठी आता मद्यपान करून वाहन चालवल्याचे दिसून आल्यास संबंधिताचे ड्रायव्हिंग लायसन रद्द केले जाईल अशी घोषणा केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. 

ते आयसीआयसीयद्वारा आयोजित रस्ते सुरक्षितता कार्यक्रमात बोलत होते.देशातील अपघातांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करून गडकरी म्हणाले, एखादी व्यक्ती मद्यपान करून गाडी चालवत असल्याचे वारंवार दिसून आले तर संबंधित चालकाचे ड्रायव्हिंग लायसन कायमस्वरूपी रद्द केले जाईल.

अतिवेग, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे हीदेखील अपघातांमागील मुख्य कारणे आहेत. हे रोखण्यासाठी प्रामुख्याने युवक आणि किशोरवयीन मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या गरजेवर गडकरी यांनी भर दिला. 

👉 क्लीक करुन वाचा साप्ताहिक विजयमार्ग

Post a Comment

Previous Post Next Post