| मुंबई | दि.23 जानेवारी 2026 | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवे उच्चांक गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरांना अखेर ब्रेक लागला आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज तसेच सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली. चांदीचे दर तब्बल 20 हजार रुपयांनी कोसळले, तर सोन्याच्या दरात सुमारे 4 हजार रुपयांची घट झाली आहे.
अलीकडे जागतिक पातळीवर अस्थिरता, भूराजकीय तणाव आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला ओढा यामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत होती. मात्र, गुरुवारी ही तेजी थांबली असून बाजारात मोठी घसरण दिसून आली. चांदीच्या 5 मार्च एक्सपायरीच्या वायद्याचे दर बुधवारी 3 लाख 25 हजार 602 रुपयांवर पोहोचले होते.
Tags:
Breaking
