न्यायमुर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा वकिलांकडून निषेध


। मुंबई । दि. 08 ऑक्टोबर 2025 । सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या बूट फेक हल्ल्याचा कौटुंबिक न्यायालय वकील संघ व अहमदनगर बार असोसिएशनतर्फे जिल्ह्यात न्यायालयात तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.


कौटुंबिक न्यायालय वकील संघाने सभा घेत घटनेचा निषेध केला. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश लगड, सचिव अ‍ॅड. राजेश कावरे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी सांगळे आदींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड. आनंद सुर्यवंशी, अ‍ॅड. राजेंद्र शेलोत, अ‍ॅड. प्रतीक्षा मंगलाराम, अ‍ॅड. सुजाता बोडखे, अ‍ॅड. उमेश नगरकर आदी सदस्य उपस्थित होते.

 

याप्रसंगी उपाध्यक्ष अ‍ॅड. वैभव आघाव, उपाध्यक्ष अ‍ॅड. संदीप बुरके, अ‍ॅड. रफीक बेग, कृष्णा झावरे, अ‍ॅड. संदीप पाखरे, अ‍ॅड. आनंद सूर्यवंशी, अ‍ॅड. रविंद्र रणसिंग, अ‍ॅड. अजिंक्य काळे, अ‍ॅड. एन. आर. शिंदे व अ‍ॅड. अभिजित देशमुख, अ‍ॅड. आनंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


बार असोसिएशनतर्फे निषेध 
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर सर्वोच्य न्यायलयाच्या वकिलाने बूट फेकून हल्ला केला. या घटनेचा अहमदनगर बार असोसिएशनने तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. यावेळी घेण्यात आलेल्या निषेध सभेच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.राजेश कातोरे होते.


सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा व्यक्तीवर नसून लोकशाही आणि संविधनावर आहे. या  घटनेचा निषेध करवा तेवढा थोडा आहे. घडलेली घटना निंदनीय असून, देशाच्या समृध्द लोकशाहीसाठी घातक आहेत.

-अ‍ॅड.सुरेश लगड
विशेष सरकारी वकील 


वकील संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी कराळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, घडलेली घटना निश्चितच निषेधार्थ अशी असून त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. हा हल्ला म्हणजे लोकशाही व संविधानावरील हल्ला आहे.

- अ‍ॅड. शिवाजी कराळे,
संस्थापक अध्यक्ष कौटुंबिक न्यायालय वकील संघ

Post a Comment

Previous Post Next Post