केजरीवाल, सिसोदियांसह दिग्गज नेत्यांचा पराभव

। नवीदिल्ली । दि. 09 फेबु्रवारी 2025 । देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी ‘आप‘ ला मोठा धक्का देत भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अरविंद केजरीवाल, मीनष सिसोदिया या बड्या नेत्यांचा पराभव झाला आहे.

दिल्लीमध्ये भाजपाने एकहाती विजय मिळविला असून सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरु केली आहे. या निवडणूकीत भाजपाने खुद्द अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह दिग्गजांना धूळ चारत विजय संपादित केला आणि तब्बल 27 वर्षांनी राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले.

सन 2011 मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलन छेडून देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 2 ऑक्टोबर 2012 मध्ये आम आदमी पार्टी हा पक्ष स्थापन केला होता. 2013 ला त्यांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीत उडी घेत. 28 जागा जिंकून आम आदमी सत्तेत आणली होती.

दिल्ली विधानसभेची निवडणूक निर्णायक ठरली असून, दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आपचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव झाला आहे, त्यांच्यासोबत मनीष सिसोदीया यांचा देखील पराभव झाला आहे.

भाजपने 70 जागांपैकी 48 जागांवर विजय मिळवला असून आपने केवळ 22 जागांवर विजय मिळवला आहे, तर काँगे्रसला मात्र एकही जागा मिळवता आलेली नाही. मात्र आपचे उमेदवार पराभूत करण्यात काँगे्रसने महत्वाची भूमिका निभावल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

 

Post a Comment

Previous Post Next Post