अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मोठा पराभव...

अजित पवार यांच्या पक्षाचा मोठा पराभव

23 उमेदवारांची अनआमत जप्त!


। नवीदिल्ली । दि. 09 फेबु्रवारी 2025 । दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. दिल्लीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 30 उमेदवार उभे केले होते. या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पक्षाला या निवडणुकीत सरासरी केवळ 0.04 टक्के मते मिळाली आहेत.

एकाच टप्प्यात झालेल्या दिल्लीतील मतदानानंतर निकाल जाहीर झाले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आम आदमी पक्षाला सत्ता राखण्यात अपयश आले. भारतीय जनता पक्षाने तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीत पुनरागमन करताना आपच्या प्रमुख नेत्यांचा सुपडासाफ केला.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे 23 उमेदवार रिंगणात होते. परंतु या सगळ्या 23 उमेदवारांची अनामक रक्कम जप्त झाली. तसेच राष्ट्रवादीचा मतटक्काही सरासरी 0.04%  एवढा गगण्य आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post