मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ
निवडणूक माहितीपत्रात माहिती लपवल्यामुळे नोटीस
। बीड । दि.14 फेबु्रवारी 2025 । धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याप्रकरणी परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने उपरोक्त आदेश देण्यात आला आहे. यावर 24 फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या सोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली, तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.
👉 रुईछत्तीसी येथील लॉजवर एलसीबीचा छापा...
परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्याफौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार केली होती.
तक्रारीची मूळ कागदपत्रे 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर सादर केली. काही दिवसांपूर्वी घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप न्यायालयाने अंशत: मान्य केले असून दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत.