। अहिल्यानगर । दि.13 फेब्रुवारी 2025 । साई लॉजींग, रूईछत्तीसी येथील वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून पिटा कायदयांतर्गत कारवाई केली. या कारवाईत 11 महिलांची सुटका करण्यात आली असून 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश लोढे, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रोहित येमुल, भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे यांनी कारवाई केली.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
शंभू उर्फ शुभम अशोक पाळंदे (वय 29, रा. मुलणमाथा, ता राहुरी) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नांव आहे. भैय्या उर्फ गणेश संपत गोरे (रा.रुईछत्तीसी) हा त्याच्या साथीदारांसह महिलांकडून वेश्या व्यवसाय चालवित आहे अशी माहिती पथकाला मिळाली होती.
भैय्या उर्फ गणेश संपत गोरे (रा.रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर) (फरार), मनोज आसाराम गावडे (रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड (फरार), शुभम अशोक पाळंदे (वय 29, रा.मुलनमाथा, ता.राहुरी, जि. अहिल्यानगर ), राणा पुर्ण नाव माहित नाही (फरार) यांच्याविरुध्द बीएनएस 143 (3), 3 (5) सह स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग