सुजय विखे यांनी आता प्रचारात इंग्रजीतच बोलावं... शिवसेनेच्या ठाकरे गटाचा टोला...


। अहमदनगर । दि.05 एप्रिल 2024 । डाॅ सुजय विखे यांनी या पुढचा प्रचार इंग्लिशमध्येच करावा तसेच शेतकरी, सामान्य नागरिकांनाही इंग्लिशमध्येच बोला अन्यथा कामे करणार नाही, असे सांगावं असा टोला शिवसेना ठाकरे गटाने लगावला आहे.  अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्लिश बोलण्यावरून टीका केली.

👉 महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

लंके यांनी आपल्यासारखे इंग्रजी भाषण करून दाखवावे आपण उमेदवारी अर्जही भरणार नाही. असे आव्हान त्यांनी दिले. विखे यांच्या या आव्हानानंतर सोशल मीडियात लंके समर्थक आक्रमक झाले आहेत. नगर शहर शिवसेनेच्या फेसबुक पेजवर विखे यांना डिवचण्यात आले आहे.

👉 शहरातून 70 लाखांची रोकड जप्त

विखे यांच्यावर आता सर्वच स्थरातून टीका होऊ लागलेली आहे. ज्यांच्या पक्षाचे पंतप्रधान हिंदीतून बोलतात त्यांनी इतरांकडून इंग्रजीत बोलण्याचा आग्रह का धरावा. विखे यांनी अगोदर आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांना इंग्रजीत बोलण्याचे आवाहन करावे, त्यानंतर त्यांनी लंके यांना आवाहन द्यावे, असे मत अऩेकांनी समाज माध्यमावर मांडले आहे.

👉 सावेडी परिसरातील एकविरा चौकात तीन ठिकाणी घरफोड्या


Post a Comment

Previous Post Next Post