जिल्हयात 37 गावांतील पाणी नमुने दूषित !


। अहमदनगर  दि.06 एप्रिल 2024 ।  राज्य आणि केंद्र सरकारकडून ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्याच्या दर महिन्यांच्या दूषित पाणी पुरवठ्याचा अहवालात दूषित पाणी असणार्‍या गावांची संख्या कमी-जास्त होताना दिसत आहे. विशेष म्हणजे एका गावातील पाणी दूषित झाल्यानंतर दुसर्‍या महिन्यांत संबंधित गावाचा पाणी अहवाल स्वच्छ आल्यावर नव्याने दुसर्‍या गावातील पाणी दूषित होत असल्याचे समोर येताना दिसत आहे. मागील महिन्यांत जिल्ह्यात 37 गावांतील पिण्याच्या पाण्याचा अहवाल हा दूषित आला आहे.

👉 सुजय विखे यांनी आता प्रचारात इंग्रजीतच बोलावं...

यात सर्वाधिक गावे ही अकोले आणि नगर तालुक्यातील असून अकोले 9 गावांची नोंद असून नगर तालुक्यात सात गांवाची नोंद असल्याचे दिसत आहे. प्रत्येकी तालुक्यात पाणी दूषित असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात नमुद करण्यात आलेले आहे. गाव पातळीवर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, स्त्रोत याठिकाणी पाणी नमुने जल संरक्षक यांच्या मार्फत घेऊन त्याची वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी यांच्या कार्यालयात असणार्‍या प्रयोग शाळेत तपाणी करण्यात येते. 

👉महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

याठिकाणी तपासणी केल्यानंतर दूषित पाणी आढळणार्‍या गावांना याबाबत कळवण्यात येऊन दूषित पाणी शुद्धीकरणासाठी प्रक्रिया राबवण्यात येते. नगर जिल्हयातील पाथर्डी, जामखेड, श्रीरामपूर या तालुक्यामध्ये एकही दुषित पाणी आढळलेले नाही. अकोले, कर्जत, कोपरगांव, नगर, नेवासा, पारनेर, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगांव, श्रीगोंदा, आदी तालुक्यातील गावांमध्ये कमी प्रमाणात दुषीत पाण्याचे गावे आढळली आहेत.

👉 शहरातून 70 लाखांची रोकड जप्त

ग्रामीण भागात पिण्याच्या पाणी शुध्दीकरणासाठी क्लोरिन पावडचा वापर करण्यात येतो. ही पावडर संबंधित गावच्या ग्रामपंचायत यांच्यामार्फत खरेदी करण्यात येते. या क्लोरिन पावडरची गुणवत्ता ही 20 टक्क्यांपेक्षा कमी  असल्यास संबंधित ग्रामपंचायतींना कळवण्यात येऊन ही पावडर पाणी शुध्दीकरणासाठी वापरू नयेत, असे बजावण्यात येते. 

👉सावेडी परिसरातील एकविरा चौकात तीन ठिकाणी घरफोड्या

दूषित पाणी असणारी गावे
वारुळवाडी, रतडगाव, दशमीगव्हाण, गुंडेगाव, कामरगाव, बारदरी, पारगांव मौला (नगर), देवठाण, पिपळगाव नाकविदा, पिपरकने, वाकी, निळवंडे, पिपळ दरी, चागीरवाडी, एकदरे, पिपळगाव खांड,(अकोले), 0 (जामखेड), महोगाव देशमुख (कोपरगाव),    0 (राहता) कोरगेाव, राक्षसवाडी, (कर्जत) शिगानापूर (नेवासा), कोहकडी, खडकवाडी (पारनेर), मांडवे, खिर्डी (पाथर्डी), खरडगाव, शेकटे बु, बेलगाव (शेवगाव), कुरणवाडी, चेडगाव, गडाखवाडी, चिंचोली, मांजरी (राहुरी), आश्वी बु, जोर्वे, मनोली (संगमनेर),  खरडगाव, शेकटे बु, बेलगाव, (शेवगांव)खरडगाव, शेकटे बु, बेलगाव  (श्रीगोंदा) आणि 0  (श्रीरामपूर) यांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post