सावेडी परिसरातील एकविरा चौकात तीन ठिकाणी घरफोड्या

। अहमदनगर । दि.03 एप्रिल 2024 ।सावेडी उपनगरात असलेल्या पाईपलाईन रोडवरील एकविरा चौक परिसरात एकाच इमारतीतील ३ घरे चोरट्यांनी -फोडली आहेत. त्यापैकी एका घरातून ६ हजारांची रोकड पळविली तर २ ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही मौल्यवान ऐवज हाती लागला नाही. याबाबत विजय रंगनाथ रावभट (रा. सी स्काय लेव्हल, साईदीप नगर, एकविरा चौक, पाईपलाईन रोड,सावेडी ) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

👉समृद्धी महामार्गावर अपघात एक ठार 

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून तसेच सेफ्टी डोअर तोडून घरात प्रवेश करत त्यांच्या मुलीचा मनी बँकेचा डब्बा तोडून त्यातील ६ हजारांची रोकड चोरून नेली. त्यानंतर त्यांच्या शेजारी असलेले डॉ. किरण रामकृष्ण गोरे व ज्ञानदेव तुकाराम चेमटे यांच्या घरांचेही सेफ्टी डोअर तोडून घरात प्रवेश करत सर्वत्र उचकापाचक करत चोरीचा प्रयत्न केला.

👉बुलढाणा व हिंगोली लोकसभा मतदारसंघाची, संभाजी ब्रिगेडची शिवसेनेकडे मागणी  

 मात्र तेथे चोरट्यांच्या हाती काहीही मौल्यवान ऐवज  हाती लागला नाही. असे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून  पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३८०, ४५४, ४५७, ४२७, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलिस हवालदार नेटके या करीत आहेत.

👉घरात गळफास घेऊन ६५ वर्षीय वृध्दाची आत्महत्या 

Post a Comment

Previous Post Next Post