काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम


। अहमदनगर । दि.11 जुलै 2023 ।  येथील काकासाहेब म्हस्के फार्मसी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा पदविका वर्गाचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याची माहिती काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी दिली आहे.

प्रथम वर्षात पवार ऋतूजा हिने ७८ टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक मिळविला, गायकवाड ऋतूजा हिने ७५ टक्के गुण मिळवून द्वितीय व शेख मिस्बाह हिने ७४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. द्वितीय वर्षात बोरकर चेतना हिने ८२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर भट्टी रेणुका हिने ८१ टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय क्रमांक व जगताप आरती हिने ७९ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विश्वस्त डॉ. सुमती म्हस्के, डॉ. दिप्ती ठाकरे, विश्वस्त डॉ.अभितेज म्हस्के, प्रशासक समिर ठाकरे, प्राचार्य नितीन ठुबे, विभागप्रमुख अमित भापकर यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.

प्रशस्त कॅम्पसमधील महाविद्यालयाची सुसज्ज इमारत, अनुभवी शिक्षकवृंद, सुसज्ज प्रयोगशाळा, वाचनालय तसेच वर्षभरात महाविद्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले, असे मनोगत प्रथम क्रमांक मिळविलेल्या बोरकर चेतना हिने व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post