लोटलेल्या दरवाजातून दीड लाख ऐवजाची चोरी


। अहमदनगर । दि.9 मे 2023 ।  लोटलेल्या दरवाजातून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आतील बेडरूम मधील कपाटातील 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एक लाख रुपये चोरून नेला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील मढी येथे घडली.

या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी मच्छिंद्र वसंत मरकड ( राहणार मढी तालुका पाथर्डी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार बडे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post