माजी सैनिक नानासाहेब सदाशिव भोर यांचे निधन


। अहमदनगर । दि.17 मे 2023 ।  अकोळनेर येथील माजी सैनिक  नानासाहेब सदाशिव भोर ( वय ७५) यांचे रविवार दिं. १४/०५/२०२३ रोजी मुत्रविकाराच्या आजाराने निधन झाले. त्यांचे मागे त्यांची पत्नी, दोन मुले, सूना व चार नातवंडे, दोन मुली जावई व चार नातवंडे असा परिवार आहे.

पंचायत समितीमधील कर्मचारी श्री प्रदीप भोर याचे ते वडील होत. जिल्हा परिषदेचे माजी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगन्नाथ भोर यांचे ते वडील बंधू होते. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे मानसिक व आर्थिक पाठबळ दिले होते.

Post a Comment

Previous Post Next Post