मिडिया मार्केटिंग क्लबच्या अध्यक्षपदी व्यवहारे, उपाध्यक्षपदी चिखले, सचिवपदी कराळे बिनविरोध यांची निवड
। अहमदनगर । दि.27 मे 2023 । नगर जिल्ह्यातील वृत्तपत्र, रेडिओ, साप्ताहिक, डिजिटल व आऊटडोअर क्षेत्रात मार्केटिंग विभागात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींच्या मिडिया मार्केटिंग क्लब (एमएमसी), अहमदनगरची स्थापना करण्यात आली. नुकत्याच संपन्न झालेल्या क्लबच्या सभेत अध्यक्षपदी रवींद्र व्यवहारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी उपाध्यक्षपदी प्रियंका चिखले व सचिवपदी अविनाश कराळे यांची निवड केली.
समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार : मुख्यमंत्री
क्लबचे सदस्य - प्रमोद गवळी, नीलेश सोनवणे, मारुती घुले, अमोल भंडारे, पवन बोदर्डे, गणेश वाघ, मंगेश थोरात, सतीश धाडगे, ओंकार जोशी, एकनाथ मोरे, पराग देशपांडे, अभिजीत निकम, संतोष लोहारकर, प्रियंका आढाव, सचिन धिल्लोड, महेश दिघे, विशाल वर्धावे, सचिन उघडे, अक्षय खरात, मनोज गावडे, अश्विन मुथा, चिन्मय सप्तर्षी, महादेव नजन, प्रवीण गारदे, अभिनंदन गायकवाड, सचिन जोशी, मोसीन शेख, सुधाकर मंगलपेल्ली यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पावसाळ्यापूर्वी सज्ज व्हा : आयुक्त जावळे
सत्कारास उत्तर देताना नूतन अध्यक्ष रवींद्र व्यवहारे म्हणाले की, क्लबच्या माध्यमातून विविध माध्यमांत जाहिरात विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी व्यवसाय वृद्धीच्या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन, जाहिरातीचे महत्व पटवून देण्यासाठी उपक्रम राबविले जातील, तसेच क्लबचे सदस्य व कुटुंबियांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे सांगितले.
