सुनीता म्हस्के यांचे अल्पशा आजाराने निधन


।  अहमदनगर । दि.27 मार्च । सुनीता अजित म्हस्के यांचे वयाच्या 54 व्या वर्षी गुरुवारी दि.23 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या सावेडी येथील वृदांवन सोसायटी येथील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी होत्या.  

नालेगाव येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुनीता म्हस्के यांच्यावर नगर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरु होते. याच दरम्यान त्यांचे निधन झाले.  त्यांच्या मागे पती, दोन मुले सुना, दिर, भाऊजाई, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.

येथील भाजप युवा मोर्चा चे माजी अध्यक्ष तसेच जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक उदय अनभुले यांच्या बहिण होत.

Post a Comment

Previous Post Next Post