युनियनच्या एकजुटीतून अनेक प्रश्न मार्गी लागतील : प्रमोद कदम

ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप सी च्या अध्यक्षपदी अमित कोरडे तर पोस्टमन एमटीएसच्या अध्यक्षपदी सलिम शेख

युनियनच्या एकजुटीतून अनेक प्रश्न मार्गी लागतील : प्रमोद कदम


। अहमदनगर । दि.19 मार्च ।  पोस्ट कर्मचारी अनेक अडचणींचा सामना करत प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत, परंतु हे करत असतांना त्यांच्या हक्कांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी युनियनच्या माध्यमातून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युनियनच्या एकजुटीतून अनेक प्रश्न मार्गी लागतील, यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आज जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर आहेत.

 पोस्टल एम्प्लॉईज युनियनच्या अधिवेशनात जुन्या पेन्शन योजना लागू करणार्‍या सरकारच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर नवीन कर्मचारी भरती करण्यात यावी, खाजगीकरण करण्यात येवू नये अशा विविध प्रश्नांवर युनियन काम करत आहे. आम्ही नूतन पदाधिकारीही यासाठी पाठपुरावा करु, असे मनोगत ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप सी नूतन  सचिव प्रमोद कदम यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप सी च्या अध्यक्षपदी अमित कोरडे व सचिवपदी प्रमोद कदम यांची फेर निवड करण्यात आली. तर पोस्टमन एम.टी.एस.च्या अध्यक्षपदी सलिम शेख व सचिवपदी सचिन देवकाते यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकारी निसार शेख, रामेश्वर ढाकणे,दत्तात्रय जासूद, महेश तामटे, सुनिल भागवत, धनंजय दैठणकर, किशोर नेमाने, अरविंद वालझाडे, शिवाजी कांबळे,  सुनिल कुलकर्णी , गणेश केसकर, शैलेश राहिंज, अर्जुन जटाले, अंबादास सुद्रीक, प्रताप कारखिले, महेश सदाफुले आदि उपस्थित होते

यावेळी अमित कोरडे म्हणाले, कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर युनियनने संघर्ष करण्याची तयारी ठेवली आहे, युनियनच्या माध्यमातून कर्मचार्‍यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविली जातील. सर्वांनी विश्वासाने आमची केलेली निवड सार्थ करुन दाखविण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे सांगितले.

प्रास्तविकांत रामेश्वर ढाकणे यांनी संघटनेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित राहून आपल्या प्रश्न सोडविण्याची गरज आहे. युनियनचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु आहे. नवीन पदाधिकारी यांचेही कार्यही संघटनेच्या लौकिकात भर घालतील, असे सांगून संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रफुल्ल काळे यांनी केले तर महेश तामटे यांनी आभार मानले. याप्रसंगी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन  व पोस्टमन एटीएसचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post