। अहमदनगर । दि.27 मार्च । मद्य सेवन करून दुचाकी चालविणार्या तिघांविरुध्द कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. बंडू बबन कांबळे (वय 35, रा. खानापूर, ता. माजलगाव, जि. बीड), विनायक पांडुरंग देशमुख (वय 39, रा. ज्येष्ठ नागरिक भवन, विनायकनगर) व लखन खंडू सूळ (वय 30, रा. जाधववाडी,तामखडा, ता. फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिर्डी येथील बँक शाखेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीमध्ये अधिक भर पडेल : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, सहायक फौजदार ढगे, हेड कॉन्स्टेबल बोरूडे, पोलिस नाईक पठाण, कॉन्स्टेबल श्रीकांत खताडे यांच्या पथकाने दि. 24 रोजी रात्री साडेसात वाजता इम्पिरिअल चौकात नाकाबंदी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुंबई प्रेस क्लब’ पुनर्विकास संदर्भात बैठक
यावेळी बंडू कांबळे हा मद्य सेवन करून त्याच्याजवळील दुचाकीवरून (एमएच 12 सीबी 5794) स्वत:च्या व दुसर्याच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी दुचाकी चालविताना आढळून आला. लखन खंडू सूळ हा मद्यसेवन करून दुचाकी (एमएच 11 एएक्स 8546) चालविताना आढळून आला. विनायक पांडुरंग देशमुख हा मद्यसेवन करून दुचाकी (एमएच 16 बीएच 8057) चालविताना आढळला. कॉन्स्टेबल खताडे यांच्या फिर्यादीवरून या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
