जुनी पाईपलाईन फुटली : नगरचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत

। अहमदनगर । दि.16 जुन ।  नगर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार आहे. नगर शहरास पाणीपुरवठा करणारी जुनी 700 एमएमसीआय मुख्य जलवाहिनी नगर-मनमाड महामार्गावरील नगर तालुक्यातील नांदगाव शिवारात फुटल्याने मध्य नगर शहरासह काही उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

बुधवारी 15 जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नांदगाव शिवारातील नगर-मनमाड महामार्गालगत असलेली मनपाची जुनी जलवाहिनी फुटली. येथील जिल्हा परिषद शाळेजवळ गॅसची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून, हे काम करताना संबंधित ठेकेदाराकडून मनपाच्या जुन्या जलवाहिनीला धक्का लागून ती फुटली आहे. 

या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मनपा पाणीपुरवठा विभागाद्वारे युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, या दुरुस्ती कामास काही वेळ लागणार असल्याने या जलवाहिनीद्वारे मुळा धरणातून होणारा पाणीउपसा बंद राहणार आहे. 

त्यामुळे बुधवारी नागापूर, बोल्हेगाव, पाईपलाईन रोड परिसर व केडगाव भागास पाणीपुरवठा झाला नाही. या भागास गुरुवारी (16 जून) पाणीपुरवठा केला गेला. मात्र, या दरम्यान, पुरेसा पाणी साठा झाला नसल्याने शहरातील अन्य भागातील पाणीपुरवठाही कमी दाबाने झाल्याचे सांगण्यात आले.

----------------

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल १७ जून रोजी 

छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 

Post a Comment

Previous Post Next Post