। अहमदनगर । दि.12 एप्रिल । महिलांची जिल्हयातील पहिली बँक असलेली अंबिका महिला सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व 15 जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. यामध्ये 14 विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळाली तर एक नवीन उमेदवाराला संधी मिळाली.
बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी येत्या 24 एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. यामध्ये पंधरा जागांसाठी 17 उमेदवार अर्ज दाखल झाले होते.
त्यात सर्वसाधारण गटातील 12 जागांसाठी 14 अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आठ एप्रिल रोजी होती. या कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार स्मिता महावीर पोखरणा व मनीषा सुभाष कुलट यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने
सर्वसाधारण जागेतील बारा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण मतदारसंघ : प्रा.मेधा यशवंत काळे, पुष्पा मोहनराव मरकड, डॉ.संध्या अशोक जाधव, पुष्पलता एकनाथ वाघ, आशा दिलीप मिस्कीन, डॉ क्रांतीकला रावसाहेब अनभुले,
शांताबाई भीमराज मोरे, अॅड.शारदा सुरेश लगड, भारती शशिकांत आठरे, सविता दिलीप गांगुर्डे, सरोजनी सुरेशराव चव्हाण, अॅड.विजय सुभाष काकडे,
अनुसूचित जाती जमाती मतदार संघ शोभना संजय चव्हाण, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघ : शोभा पंडितराव खरपुडे, विजाभज : विमाप्र मतदार संघ : सुमन गणेश गोसावी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक के आर रत्नाळे यांनी काम पाहिले. अपक्ष उमेदवार स्मिता महावीर पोखरणा व मनीषा सुभाष कुलट यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन
बँकेचा मोठा खर्च वाचवला त्याबद्दल त्यांचे संस्थापिका प्रा.मेधाताई काळे यांनी आभार मानले तसेच सर्व सभासदांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
Tags:
Ahmednagar
