ओबीसी आरक्षणाचं विधेयक एकमताने विधानसभेत मंजूर

। मुंबई । दि.07 मार्च । ओबीसी आरक्षणाचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं आहे. सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ निवडणुका घेण्याचे अधिकार असणार आहेत, निवडणूक वगळता इतर अधिकार राज्यसरकारकडे आले आहे.

विधानसभेत ओबीसी विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर हे विधेयक मांडण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचे काही अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहेत.

प्रभागरचन, आरक्षण ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे घेण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ आता निवडणुका घेण्याचे अधिकार असतील.

आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर करता येणार नाही. राज्य सरकारला हे विधेयक मंजूर झाल्यानं आता चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

हे देखील वाचा...छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नावरण 

हे देखील वाचा...मेव्हण्याने मेव्हण्याला केली फुंकणीने बेदम मारहाण 

हे देखील वाचा...मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन 

 

Post a Comment

Previous Post Next Post