। अहमदनगर । दि.07 मार्च । मेव्हण्याने मेव्हण्याला चूल फुंकण्याच्या फुंकणीने बेदम मारहाण करण्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.
राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर कारखाना वांबोरी-राहुरी फॅक्टरी परिसरात राहणारा सुरेश राघु शिंदे हा त्याच्याच घरी त्याच्या बायकोकडे पैसे मागत होता.
त्याचा राग मनात धरून बायकोचा भाऊ मेव्हणा दादू चव्हाण (रा. प्रसादनगर) याने सुरेश याला शिवीगाळ करीत चूल फुंकण्याच्या फुकणीने पायावर, पाठीवर, हातावर बेदम मारहाण करुन धमकी दिली.
जखमी मेव्हणा सुरेश राघु शिंदे याच्या फिर्यादीवरून मारहाण करणारा बायकोचा भाऊ मेव्हणा दादू चव्हाण याच्याविरुद्ध राहुरी पोलिसात भारतीय दंड विधान कायदा कलम 324 504, 506 प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हवालदार गर्जे पुढील तपास करीत आहेत. मेव्हण्याला मेव्हण्याने मारहाण केल्याची घटना परिसरात चर्चेची झाली आहे.
Tags:
Ahmednagar