। अहमदनगर । दि.05 मार्च । मोटारसायकलला अडकवलेली कापडी बॅग हिसकावून दोन लाखाचा ऐवज पळविण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील बारामती बँकेतून रोकड घेऊन जात असताना श्रीगोंदा शहरातील संजोग हॉटेलच्या नजीक आल्यानंतर अचानक गाडीच्या हँडेलला अडकवलेली पिशवी हिसकावून घेऊन पळून नेल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बारामती सहकारी बँकेमधून तालुक्यातील टाकळी लोणार येथील पोपट मल्हारी बुणगे यांनी आपल्या शेतात पिकवलेला ऊस कारखान्याला घातल्यावर त्या उसाचे बिल बँकेत जमा झाले, ते काढून घेण्यासाठी पोपट मल्हारी बुणगे व त्यांचे बंधू मस्कु किसन बुणगे हे दुचाकीवरून काष्टी या ठिकाणी गेले.
बँकेतून त्यांनी रक्कम काढून घेतली आणि एक म्हशींसाठी मॅट घेतले व दोन्ही बंधू काष्टीकडून श्रीगोंद्याकडे निघाले. ते श्रीगोंदा शहरानजीक आल्यानंतर हॉटेल संजोगच्या परिसरात त्यांच्या पाठीमागे कोणीतरी पाठलाग करत होते. त्यांनी गाडी यांच्या दुचाकीजवळ येऊन गाडीच्या दुचाकीला अडकवलेल्या पिशवीला जोरदार हिसका मारला आणि पिशवीतील 1 लाख 97 हजार रुपयांच्या रोकडसह त्यातील कीटकनाशके घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
या अज्ञात चोरांच्या दुचाकीवर पुढे बसलेल्या व्यक्तीने पांढर्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट तर त्याच दुचाकीवर मागे बसलेल्या व बॅग हिसकावणार्याने अंगात गुलाबी रंगाचा शर्ट काळसर रंगाची पॅन्ट घातली असून, त्याचा रंग सावळा व चेहरा गोल असे वर्णन असल्याचे तक्रारीत सांगितले आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित माळी, हेड हवालदार रोहिदास झुंजार करत आहेत.
हे देखील वाचा...निलंबित व बडतर्फीची नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत ...
हे देखील वाचा...ऑस्ट्रेलियचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे निधन
हे देखील वाचा...उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी ...