डीसीपीएस आणि एनपीएस खाती उघडण्यासाठी विशेष मोहीम : शिक्षणमंत्री


। मुंबई । दि.22 मार्च । राज्यात परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 65 हजार 165 प्राथमिक आणि 60 हजार 332 माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खाती उघडण्यात आली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 50 हजार 497 प्राथमिक व 60 हजार 118 माध्यमिक खाती उघडण्यात आली असून या सर्व खात्यांवर शासन हिश्श्याची 

रक्कम जमा करून पावत्या देण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र डीसीपीएस योजनेविरूद्ध न्यायालयात दावे दाखल असल्याने काही कर्मचाऱ्यांनी ही खाती उघडण्यास विरोध केला. त्यामुळे विशेष मोहीम हातात घेऊन ही खाती उघडण्यात आली येईल, अशी माहिती माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना परिभाषित अंशदायी योजना लागू केली आहे. तसेच नव्याने 20 टक्के व 40 टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना नाही. सदर पदांना 100 टक्के अनुदान मंजूर झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू होते. त्यामुळे यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री कपिल पाटील, डॉ.रणजीत पाटील यांनी विचारला होता.

Post a Comment

Previous Post Next Post