महाविकास आघाडीचा आणखी एक मंत्री चौकशीच्या भोवऱ्यात

महाविकास आघाडीचा आणखी एक मंत्री 

चौकशीच्या भोवऱ्यात; राज्यपालांनी दिले आदेश

 

। अकोला । दि.27 फेब्रुवारी ।  राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी 94 लाख रुपयांच्या शासन निधीची अफरातफर केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने अकोला पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

 न्यायालयाने या संदर्भामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, नियमानुसार पालकमंत्र्यांवर किंवा कोणत्याही मंत्र्यांवर चौकशी करण्यासाठी राज्यपाल यांची परवानगी लागते. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांनी 21 फेब्रुवारीला अकोला पोलीस अधीक्षक यांना पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 

काय आहे प्रकरण?

शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. बच्चू कडू यानी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेत अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता. याबाबतची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आली होती. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर आता राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post