गॅस डिलरशिप देतो म्हणत पाच लाखांचा गंडा

 

। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी । भारत गॅसची डिलरशिप देतो, असे खोटे सांगून बनावट इ-मेलद्वारे खोटी शासकीय कागदपत्रे देत एका व्यावसायिकाला 5 लाख 27 हजार रूपयांचा गंडा घातला. याप्रकरणी नगर तालुक्यातील जेऊर येथील व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्यावसायिकाने धाव घेतल्यामुळे ही घटना समोर आली आहे. दि. 3 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली. तर शुक्रवारी हा गुन्हा दाखल झाला आहे. व्यावसायिकाला एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला होता.

भारत गॅस एजन्सीतून असिस्टंट मॅनेजर हरीष रावत बोलत असल्याचे सांगून तुम्हाला भारत गॅसची डिलरशिप देतो, असे म्हणत त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फोनवर बोलणार्‍या व्यक्तीने फिर्यादीला बनावट मेलद्वारे खोटी शासकीय कागदपत्रे पाठवली. यासाठी 5 लाख 27 हजार रूपये घेत त्यांची फसवणूक केली.

ही रक्कम युको बँकेच्या खात्यावर घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बनावट कागदपत्रांचा खरे असल्याचे भासवून गुन्हा करणे, फसवणूक, माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post