...अन्यथा, संभजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने धडा शिकवेल : डॉ. शिवानंद भानुसे


। औरंगाबाद । दि.28 फेब्रुवारी । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. संभाजी ब्रिगेडने कोश्यारी यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

पुढे बोलताना डॉ.शिवानंद  भानुसे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे रामदास हे गुरू नव्हते हे तज्ञ इतिहासकारांनी, अभ्यासकांनी सिद्ध केलेलं आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री वसंतरावजी पुरके यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ इतिहासकारांची, अभ्यासकांची समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये बाबा पुरंदरे सुद्धा होते.

त्या समितीने अभ्यास करून सिद्ध केलेल आहे की रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते. एवढेच नव्हे तर छत्रपती शिवराय आणि रामदास यांची भेट सुद्धा झालेली नाही. त्यानंतर 2013 मध्ये मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सांगितले आहे की, रामदास शिवरायांचे गुरु नव्हते. त्यांची भेट सुद्धा झालेली नाही.

रामदास आणि शिवरायांचा काही संबंध नाही. असे असताना सुद्धा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत आहेत. जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करत आहेत. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने धडा शिकवेल.

Post a Comment

Previous Post Next Post