आज ८७३ रूग्णांना डिस्चार्ज तर
नव्या ६१९ बाधितांची रुग्ण संख्येत भर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४० टक्के
। अहमदनगर । दि.13 सप्टेंबर । जिल्ह्यात आज ८७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २१ हजार ६३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ३५४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९५ आणि अँटीजेन चाचणीत १९९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, जामखेड ०४, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पारनेर १२, पाथर्डी ३२, राहुरी ०२, संगमनेर ०७, शेवगाव ०१, श्रीगोंदा ४८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले २४, जामखेड ०६, कर्जत ०९, कोपरगाव ०४, नगर ग्रा.२३, नेवासा २२, पारनेर १४, पाथर्डी १२, राहाता ०७, राहुरी ०७, संगमनेर ६८, शेवगाव २८, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर २९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १९९ जण बाधित आढळुन आले. अकोले १७, जामखेड ०३, कर्जत १७, कोपरगाव ११, नगर ग्रा. ०३, नेवासा ३२, पारनेर १६, पाथर्डी २०, राहाता ०१, राहुरी ०४, संगमनेर ४६, शेवगाव २१, श्रीगोंदा ०६ आणि श्रीरामपुर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ५५, जामखेड २२, कर्जत ६४, कोपरगाव ४१, नगर ग्रा. ३५, नेवासा ५०, पारनेर १३९, पाथर्डी ३४, राहाता १७, राहुरी ३३, संगमनेर १९४, शेवगाव ३८, श्रीगोंदा ८३, श्रीरामपूर २८, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या : ३,२१,६३२
*उपचार सुरू असलेले रूग्ण : ५३५४
*पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६६५९
*एकूण रूग्ण संख्या : ३,३३,६३६
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक १३ सप्टेंबर, २०२१
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
Tags:
Breaking
