डोळ्यात मिरची पावडर टाकून लाखोंची बॅग पळवली

। अहमदनगर । दि.13 सप्टेंबर । शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या, घरफोड्यांच्या घटनेमध्ये वाढ झाली असल्याच दिसून येत आहे. त्यातच धुमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. सावेडी भरदिवसा दोन लाख रुपयांची बॅग पळवल्याची घटना ताजी असतानाच आज डोळ्यात मिरची पावडर टाकून प्रकाश वाईन्स दुकाना जवळून 10 लाख 70 हजार रुपयांची बॅग पळवल्याची घटना रविवारी सावेडी रोडवर घडली आहे.

याप्रकरणी सदर दुकानाचे मॅनजेर शेख यांनी तोफखाना पोलिसा ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, प्रकाश वाईन्स दुकानातील रोख रक्कम 10 लाख 70 हजार काळ्या रंगाच्या हॅण्ड बँगमध्ये ठेवले होते. नगर- मनमाड रस्त्यावर सारस्वत बँकेसमोर काळ्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या पल्सर मोटत्तरसायकवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या चेहर्‍यावर तसेच डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून त्यांच्या जवळील रकमेची बॅग बळजबरीने चोरुन नेली.

तोफखाना पोलिसा ठाण्याच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरिक्षक किरण सुसरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच तपासाची सुत्रे फिरवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post